मलकापुरात किरकोळ वादातून कुऱ्हाडीने हल्ला; २१ वर्षीय तरुण गंभीर जखमी, तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
मलकापूर : – शहरातील गणवाडी रोडवरील गोरक्षण शेत परिसरात बैलगाडा शर्यतीचा सराव पाहण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय तरुणावर किरकोळ कारणावरून कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सायकलपुरा परिसरातील सैयद शहनवाज सैयद नाशीर (वय २१) हा १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गणवाडी रोड परिसरात…
