
विषारी औषध प्राशन करून २० वर्षीय तरुणाची आत्महत्या, मोताळा तालुक्यातील खरबडी येथील घटना!
मोताळा :- तालुक्यातील खरबडी येथील २० वर्षीय युवकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली….
मोताळा :- तालुक्यातील खरबडी येथील २० वर्षीय युवकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना १ एप्रिल रोजी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मृत युवकाचे नाव ओम दिलीप किनगे असे असून, विष घेतल्यानंतर त्याची प्रकृती गंभीर झाल्याने नातेवाइकांनी त्याला तातडीने बुलढाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले….
मलकापूर :- शहरातील सालीपुरा भागात एका २४ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. माहितीनुसार, अमोल कडू देवकर (वय २४) याने सकाळी ११ वाजताच्या सुमारास आपल्या घरात गळफास घेतला. घरच्यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि पुढील…
खामगाव :- शहर पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा विवाह लावून तिला गर्भवती केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस तपासानुसार, मलकापूर येथील १७ वर्षे ११ महिने वयाच्या पीडितेचा बालविवाह अजय मेंडे (२५, रा. मलकापूर) याच्यासोबत घडवून आणला. १९ मे २०२४ ते १ एप्रिल २०२५ या कालावधीत हा प्रकार घडला. विवाहानंतर अत्याचार झाल्यामुळे मुलगी गर्भवती झाली आणि…
खामगाव : एका तरुणीने मैत्री तोडल्यानंतरही तिचा पाठलाग करत तिला लग्नासाठी जबरदस्ती करणाऱ्या युवकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुटाळा खु. येथे राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणीची गणेश गजानन कुन्हाडे (रा. खातखेड, ता. नांदुरा) याच्यासोबत मैत्री होती. मात्र, तरुणीने काही कारणास्तव त्याच्याशी संबंध तोडले. तरीही गणेश तिला वारंवार त्रास देत होता. रविवारी त्याने तरुणीच्या घरासमोर येऊन…
खामगाव: शहरातील डी. पी. रोड परिसरात एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून दोन अज्ञात चोरटे पसार झाल्याची घटना घडली. मंदा मधुकरराव देशमुख (७०) या २९ मार्च रोजी रात्री ८:३० वाजता चिंतामणी गणपती मंदिरातून दर्शन घेऊन घरी परतत होत्या. घराजवळील पंजाबीताई यांच्याशी त्या बोलत असताना, दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील ३० ग्रॅम वजनाचे…
नांदुरा( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ): नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ५ लाख २० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या कर्नाटकमधील युवकाला नांदुरा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपी शिवरंजन मंडीलाल आप्पा पुजारी (२८, रा. खारमनी, जि. बेळगाव, कर्नाटक) याने नांदुरा येथील अक्षय देविदास सातव (२६, रा. खुमगाव बुर्टी) यांना…
मलकापूर (दिपक इटणारे): बुलढाणा रोड आणि व्यापारी पट्ट्यात तीन दिवस गायब असलेली कचरा गाडी अखेर विदर्भ लाइव्हच्या बातमीनंतर सुरू झाली आहे. शहरातील स्वच्छतेबाबत प्रशासनाच्या दुर्लक्षावर विदर्भ लाइव्हने आवाज उठवताच, नगरपालिका प्रशासनाने हालचाल केली आणि कचरा गाडी पुन्हा नियमित फिरू लागली. गेल्या काही दिवसांपासून कचऱ्याचा ढीग साचत असल्याने व्यापारी आणि नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती….
( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) बुलढाणा : समाज माध्यमांचा गैरवापर करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशाच एका प्रकरणात अमडापूर पोलिसांनी वादग्रस्त व्हिडिओ पोस्ट केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला आहे. कामरान अन्सारी असे आरोपीचे नाव असून, त्याने समाज माध्यमांवर दोन समाजांत द्वेष आणि तणाव निर्माण करणारा व्हिडिओ पोस्ट केला होता. या…
मलकापूर (दिपक इटणारे): शहरातील स्वच्छतेबाबत प्रशासनाचे दुर्लक्ष स्पष्ट होत असून, सलग तिसऱ्या दिवशीही बुलढाणा रोड आणि व्यापारी पट्ट्यात कचरा गाडी फिरकली नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, मच्छर आणि रोगराईचा धोका वाढला आहे. व्यापारी आणि नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर सवाल उपस्थित करत नगरपालिकेच्या कारभारावर नाराजी…
( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) बुलढाणा : प्लॉटवरून सुरू असलेल्या वादात हस्तक्षेप केल्याचा राग मनात धरून दोघांनी एका युवकाला थेट घराच्या छतावरून खाली फेकून गंभीर जखमी केले. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी अमजद बागवान आणि शफीक बागवान यांच्याविरोधात २९ मार्च रोजी गुन्हा दाखल केला आहे. प्रशांत रमेश बोर्डे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, प्लॉटच्या वादात मध्यस्थी…