मलकापूर :- पदमश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूरच्या पॉलिटेक्निक विभागातील विद्युत अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी नुकतीच बऱ्हाणपूर येथील नामांकित कंपनी, लुबी इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड येथे औद्योगिक भेट नुकतीच मागील आठवद्यात आयोजित करण्यात आली. ही भेट विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाशी संबंधित उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली. उद्योगांच्या तांत्रिक, व्यावसायिक, आणि व्यवस्थापनीय पैलूंची माहिती मिळवणे हे अशा भेटींचे प्रमुख उद्दिष्ट असते. औद्योगिक भेटीच्या सुरुवातीला लुबी इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजर श्री. विनय पाटीदार यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले आणि त्यांना कंपनीची उत्पादन प्रक्रिया, वापरली जाणारी अद्ययावत यंत्रणा, गुणवत्ता नियंत्रण प्रणाली, आणि उत्पादनांच्या जागतिक बाजारपेठेतील भूमिका याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. श्री. पाटीदार यांनी विद्यार्थ्यांना कंपनीचे विविध विभाग दाखवले आणि विद्युत अभियांत्रिकीच्या दृष्टीने तांत्रिक कौशल्यांच्या महत्त्वाबद्दल चर्चा केली. या प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांना उद्योगाच्या व्यावहारिक ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.
या भेटीमध्ये विद्युत अभियांत्रिकी विभागातील प्रा. पवन ठाकरे, प्रा. दीपक जोशी, आणि प्रा. ऐश्वर्या भाटकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी उद्योग क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, उपकरणे, आणि औद्योगिक प्रथांबाबत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळवली. तसेच, लुबी इंडस्ट्रीजच्या उत्पादन व्यवस्थापनातील कार्यप्रणालीबद्दल अधिक जाणून घेतले. या औद्योगिक भेटीचे आयोजन विद्युत अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. जयप्रकाश सोनोने यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे आणि प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे ही भेट अत्यंत यशस्वी ठरली. प्रा. जयप्रकाश सोनोने यांनी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी अशा औद्योगिक भेटींचे महत्त्व सांगितले आणि त्याद्वारे उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्र यांच्यातील दुवा अधिक मजबूत करण्याची गरज व्यक्त केली.
विद्युत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना उद्योगांमधील अद्ययावत तंत्रज्ञानाचे आणि औद्योगिक प्रक्रियांचे प्रत्यक्ष ज्ञान मिळवण्यासाठी ही औद्योगिक भेट अत्यंत फायदेशीर ठरली. एकूण ६७ विद्यार्थ्यांनी या भेटीत सहभाग घेतला. या भेटीमुळे विद्यार्थ्यांचे औद्योगिक क्षेत्रातील व्यावहारिक ज्ञान आणि कौशल्ये विकसित होण्यास मदत झाली, तसेच भविष्यातील करिअरच्या संधींबाबत त्यांना नवीन दिशा मिळाली. विद्यार्थ्यांनी या भेटीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि उद्योगातील प्रत्यक्ष अनुभवामुळे त्यांचे ज्ञान व आत्मविश्वास वाढला आहे. लुबी इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेडने विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांचे भविष्यातील औद्योगिक जीवन समृद्ध करण्यास महत्त्वपूर्ण योगदान दिले.