Headlines

घरात घुसून महिलेचा विनयभंग; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

देऊळगाव राजा : देऊळगाव मही येथे एका महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आपल्या घरात असताना जुन्या वादाच्या कारणावरून आरोपीने घरात जबरदस्तीने प्रवेश केला. त्यानंतर महिलेचा हात धरून तिला घराबाहेर ओढत नेले व तिचा विनयभंग केला. तसेच या घटनेदरम्यान आरोपीने महिलेच्या तसेच तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, महिलेच्या मुलांनी आरडाओरडा केल्याने शेजारील नागरिक घटनास्थळी धावून आले. परिसरातील लोक जमा होत असल्याचे पाहून आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेनंतर पीडित महिलेने तत्काळ पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगासह विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!