शेगाव : विद्युत कंत्राटदाराने गोडाऊन मध्ये ठेवलेले ७० हजाराचे इलेक्ट्रीक साहित्य अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना येथील श्रीकृष्ण नगरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी शेगाव शहर पोस्टेत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंत्राटदार नितेश दिलीप माने (३३) यांनी पोस्टेत तक्रार दिली की त्यांनी द्वारकामाई श्रीकृष्ण नगरात इलेक्ट्रिक साहित्य ठेवलेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्याने सदर गोडावून मधून कॉपरची बायर, क्लॅम्प, लग्ज, एचटी, एलटी फॅब्रीकेशन मटेरिअल असे एकुण ७० हजाराचे साहित्य लंपास केले. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खहबळ उडाली याबाबत नितेश माने यांनी शहर पो. स्टे. ला तक्रार दिली असून त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे.