Headlines

शेगाव मध्ये चोरींचे प्रमाण वाढले,घर फोडून चोरट्यांनी दाग दागिन्यांसह 2 लाख 25 हजारांचा मुद्देमाल केला लंपास!

शेगाव : शेगाव शहरात चोरींचे प्रमाण वाढतच चालले आहे. मागील महिन्यात अनेक चोरींच्या घटना घडल्या आहेत अशीच एक घटना येथील रोकडीया नगरात असलेल्या नालंदा कॉलनी मध्ये ५ ऑगस्ट रोजी घडली. चोरट्यांनी घर फोडून २ लाख २५ हजाराचा मुद्देमाल लंपास केला आहे.याबाबत योगेश गोपाळराव मुके वय ३४ वर्ष रा.नालंदा कॉलणी, रोकडीया नगर शेगाव यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली की, घरी कोणीही हजर नसताना कोणीतरी अज्ञात इसमाने घराचे दरवाज्याचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश करून सोन्याचे पेंडल वजन अंदाजे ०४ ग्रॅम प्रत्येकी ग्रॅम ३,०००/-रू प्रमाणे किंमती अंदाजे १२,०००/-रूपये, चांदीचे जोडवे अंदाजे वजन २० तोळा अंदाजे किंमती १,५००/-रू, चांदीच्या मुर्त्या ५ नग वजन अंदाजे ५० तोळे किंमती अंदाजे २, ०००/-रु नगदी ६०,०००/-रूपये. दिसुन आले नाही तसेच तिस-या रूम मध्ये असलेले लाकडी कपाटाचे लॉक तुटलेले दिसले त्यामध्ये ठेवलेले, सौभाग्याची सोन्याची पोत वजन अंदाजे २० ग्रॅम किमंती अंदाजे ६००००/- रुपये, कारले मन्याचे पोत वजन अंदाजे १० ग्रॅम किंमत अंदाजे ३००००/- रुपये, सोन्याचा गोप वजन अंदाजे १५ ग्रॅम किंमती अंदाजे ४५,०००/- रूपये, सोन्याचे पेंडल वजन अंदाजे ५ ग्रॅम किंमती अंदाजे १५,०००/- असा एकुण २,२५,५००/- रूपयेचा मुददेमाल लंपास केला आहे. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून कलम ३०५ (A),३३१ (३) भा. न्या. स नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *