Headlines

रस्त्याच्या कडेला उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पळविली, शेगाव पोस्टेत गुन्हा दाखल!

शेगावः येथील कालखेड रोडवर उभी असलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना ३१ जुलै रोजी दुपारी २ वाजता घडली.याबाबत सुनिल जगन्नाथ ठोंबरे वय ५० वर्षे (तलाठी) रा. ओमनगर शेगांव यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की कालखेड रोडभाग नं ३ मध्ये असलेल्या माझ्या शेतात दुचाकी क्र. MH 28-AF- 1101 गेलो असता दुचाकी रस्त्याचे कडेवर ठेवून शेतात चक्कर मारण्यासाठी आत गेलो शेतामधुन चक्कर मारुन दुपारी ३ वा सुमारास घरी जाण्यासाठी निघालो. त्यावेळी रस्त्याचे कडेवर ठेवलेली माझी दुचाकी दिसली नाही. मी आजुबाजूला शोध घेतला परंतु मिळुन आली नाही. ती अज्ञात चोरटयाने चोरुन नेली आहे. अशा फिर्यादीचे रिपोर्टवरुन अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३०३(२) भा. न्या. सं. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *