Headlines

भरधाव ट्रक आणि चार चाकी वाहनाची समोरासमोर धडक,मलकापूर तालुक्यातील काटी फाट्यानजीकची घटना

मलकापूर: भरधाव ट्रक आणि चारचाकीचा वाहनाची समोरासमोर धडक झाली ही घटना दि. 4 जुलै गुरुवार रोजी राष्ट्रीय महामार्ग क्र.५३ वर काटी फाट्यानजीक ४.३० वाजताच्या सुमारास घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी की राष्ट्रीय महामार्ग ५३ वर कल्याण टोल कंपनीच्या वतीने गुरुवारी सकाळ पासून रस्त्यावर कलर पट्टे मारण्याचे काम चालू होते यासाठी एकतर्फी वाहतूक वळविण्यात आली होती…

Read More

सीईटी सेल कडून इंजिनिअरिंग प्रवेशा च्या तात्पुरत्या तारखा जाहीर

मलकापूर: महाराष्ट्र राज्य सीईटी सेल कडून दिनांक 4 जुलै रोजी इंजिनिअरिंग प्रवेशाच्या तात्पुरत्या तारखा जाहीर झाल्या आहेत. सर्व विद्यार्थी व पालक वर्ग सीईटी सेल कधी नवीन अपडेट देणार याबद्दल खूप आतुरतेने वाट होते. सीईटी सेल ने जाहीर केलेल्या पत्रकात येत्या 10 जुलै पासून इंजिनिअरिंग प्रवेशाला सुरु होईल. ही तात्पुरती तारीख जाहीर केली आहे. अभियांत्रिकी प्रवेश…

Read More

सासू,पती,नणंद पैशांसाठी त्रास द्यायचे, सासरच्या जाचाला कंटाळून 21 वर्षीय विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल,तीन जणांविरुद्ध गुन्हा, तिघांना न्यायालयीन कोठडी

जानेफळ : माहेरवरून पैसे आणण्यासाठी सासरच्यांनी केलेल्या छळाला कंटाळून २१ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन २ जुलै रोजी आत्महत्या केली होती. याप्रकरणी जानेफळ पोलिसांनी पतीसह सासरच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. तिन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. रुख्मिना प्रशांत साबळे असे मयत विवाहितेचे नाव आहे….

Read More

पत्रकारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी व्हॉइस ऑफ मीडियाचे तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..

मलकापूर (प्रतिनिधी) – पत्रकारांच्या अनेक न्याय हक्काच्या मागण्या शासन दरबारी प्रलंबित असून त्या मागण्या तातडीने सोडविण्यात याव्यात अशी मागणी आज ४ जुलै रोजी व्हाईस ऑफ मीडिया मलकापूर तालुका व शहरच्या वतीने जिल्हाधिकारी बुलढाणा यांचेकडे तहसीलदार राहुल तायडे यांचे मार्फत एका निवेदनाद्वारे करण्यात आली. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विधानसभा निवडणुकीत, सण, उत्सव काळात यादीवरील सर्व…

Read More

नळगंगा नदीपात्रात आढळला 51 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह, मोताळा तालुक्यातील घटना

मोताळा :- नळगंगा नदीपात्रात एका ५१ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. ही घटना 3 जुलै रोजी गावातीलच एका व्यक्तीला दिसून आल्याने उघडकीस आली आहे.बाळू शिवराम देवकर रा. बोराखेडी असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी राजू टोकरे यांच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राजू रमेश टोकरे यांनी बोराखेडी पोलीसात दिलेल्या फिर्यादीनुसार २…

Read More

कुंड खु. येथील सरपंच सौ. वैशाली राकेश पाटील यांना मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ यांचे कडून सरपंच अपात्रतेबाबत मिळाला स्थगिती आदेश, गावकरी नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण

मलकापूर (प्रतिनिधी): तालुक्यातील कुंड खुर्द येथील सरपंच सौ. वैशाली राकेश पाटील यांना सरपंच व सदस्य पदावरून अपात्र करण्यात यावे याबाबत प्रकरण दाखल करण्यात आले होते. उपरोक्त प्रकरणी अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी ग्रा.प.प्र. कलम १४(१) (ज-३)/ कुंड ६६/२०२१-२२ नुसार दि.६ जुलै २०२२ रोजी सदर प्रकरणात सरपंच व सदस्य अपात्र करण्यात आलेला आदेश पारित करण्यात आला…

Read More

मलकापूर कृषी उत्त्पन बाजार समितीत चिखलाचे साम्राज्य, सर्वत्र घाणच घाण, शेतकरी व व्यापाऱ्यांचे हाल.. नागरिकांच्या जीवाशी खेळला जातोय खेळ, संबंधितांनी या गंभीर समस्येवर लक्ष देण्याची गरज..

मलकापूर:- कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वत्र चिखल झाले आहे. त्यात मोठे मोठे पाण्याचे डबके साचल्याने त्यातून चालणे ही कठीण झाले आहे. या चिखलाचा शेतकरी व व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्न निर्माण होत आहे. याबाबत सविस्तर असे की मलकापूर येथील नांदुरा रोडवर कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. या…

Read More

जग्गू डॉनचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला ! कापूस फसवणूक प्रकरणी झालेली आहे अटक

मलकापूर – दिनांक 3 जुलै 2024 मलकापूर पंचक्रोशीतील गाजलेल्या शेतकरी फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी जगन उर्फ जग्गू रामचंद्र नारखेडे यांचा जामीन अर्ज विद्यमान जिल्हा व सत्र न्यायालय मलकापूर यांनी फेटाळला आहे. याबाबत अधिकृत असे की मलकापूर तालुक्यातील शेतकरी बांधवांना जास्त भावाने कापूस खरेदी करण्याचे आमिष देऊन कापूस खरेदी केला व त्याचे कापूस खरेदीचे रकमेचा परतावा…

Read More

वायफर दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या ट्रेलरला भरधाव ट्रकची धडक, एक गंभीर जखमी समृद्धी महामार्गावरील घटना

मलकापूर पांग्रा : वायफर दुरुस्तीसाठी समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रेलरवर भरधाव ट्रक आदळला यामध्ये तीनजण जखमी झाले असून त्यातील एकजण गंभीर जखमी झाला आहे ही घटना समृद्धी महामार्गावर चॅनल क्रमांक ३३५ ५ वर २ जुलै रोजी घडली. ट्रेलर क्र. एमएच ४९ एटी ३१४८ चे वायफर बिघडल्याने समृद्धी महामार्गावर उभा होता यावेळी मागून येणाऱ्या भरधाव ट्रक…

Read More

घर बंद करून परिवारासह पुण्याला गेले, संधीचा फायदा घेत चोरट्याने घर साफ केले, 1 लाख 35 हजारांचा मुद्देमाल लंपास.. खामगावची घटना

  खामगाव:- संधीचा फायदा घेत येथील एमआयडीसी भागातील गौरा नगरातील एका बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी एक लाख ३५ हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना सोमवारी उघडकीस आली. तक्रारीनुसार, प्रदीपकुमार डिगांबर इंगळे (३४) हे परिवारासह पुणे येथे गेले होते. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी इंगळे यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील देवी देवतांच्या…

Read More
error: Content is protected !!