Headlines

मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार द्यायला आलेल्या पोलीस अंमलदारावर गुन्हा दाखल

( वृतसंस्था )अकोला : पोलिस मुख्यालयात कर्तव्यावर असलेले पोलिस अंमलदार गणेश पाटील (रा. खडकी) यांनी खदान पोलिस ठाण्यात त्यांच्या नऊ वर्षाच्या मुलाचे नरबळीच्या उद्देशाने अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली. मात्र असे काही झालेच नसल्याची बाब समोर आल्या नंतर वाद झाला. यावेळी गणेश पाटील यांनी खदान पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या ड्युटी ऑफीसरला जातीवाचक अश्लिल शिवीगाळ केल्याने त्यांच्या…

Read More

झोपमोड केल्याच्या रागातून मुलाने केली आईची हत्या, मुलास अटक : चाकू हस्तगत

( वृतसंस्था )मुंबई : झोपमोड केल्याच्या रागात मुलाने सुन्ऱ्याने वार करून ७८ वर्षीय आईची हत्या केली. ही घटना चुनाव लेनच्या पंडितालय इमारतीत घडली. रमाबाई नथू पिसाळ असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी डॉ. डी. बी. मार्ग पोलिसांनी आरोपी मुलगा सुभाष पुंजाजी वाघ (६४) याला अटक केली आहे. सुभाष हा पहिल्या पतीचा मुलगा असून, तो…

Read More

लाडकी बहीण योजनेचे अॅप कासव गतीने’ महिलांची सेतू केंद्रावर येरझार

मलकापूर( दिपक इटणारे ):- महाराष्ट्र राज्य शासनाने नुकतेच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना या योजने अंतर्गत महिन्याला पंधराशे रुपये अनुदान देण्याचे जाहीर केलं आहे परंतु या योजनेचे कागदपत्रे अपलोड करण्याचे महिला शक्ती संकेतस्थळ अॅप अतिशय कासव गतीने चालत असल्याने महिला वर्गाकडून सेतू केंद्रावर येरझार होत असल्याचे चित्र दिसत आहे. नुकतेच दर महिन्याला…

Read More

अल्पवयीन मुलीने उचलले टोकाचे पाऊल,सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विहिरीत उडी घेऊन..

बुलढाणा : बुलढाणा तालुक्यांतील एका अल्पवयीन मुलीने सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विहिरीत उडी घेऊन आपली जिवन यात्रा संपवली ही घटना १० जुलै रोजी बुलढाणा शहरातील चैतन्यवाडीत परीसरात घडली. मृत मुलीचे नाव कोमल संदीप सुसर असे नाव आहे. बुलढाणा तालुक्यातील शिरपूर येथील संदीप सुसर हे मुलांच्या शिक्षणासाठी बुलढाणा शहरात राहतात. त्यांची कोमल ही मुलगी दहाव्या…

Read More

महिला काँग्रेस बुलढाणा यांची आढावा बैठक संपन्न

मलकापूर :- आज दी. 9/7/24रोजी महिला काँग्रेस ची आढावा बैठक व “महिला न्याय दरबाराचे “उद्घाटन. डॉ संजीवनी ताई बीहाडे उपाध्यक्ष महाराष्ट्र महिला काँग्रेस यांच्या वाढदिवसाच्या अवचित्त साधून सौ मीनलताई आंबेकर व संजीवनी ताई यांच्या हस्ते बुलढाणा येथे करण्यात आले.या मध्ये महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी तीन महिलांची समिती बनवण्यात आली. यामध्ये निवृत्त अधिकारी म्हणुन प्रा. मीनलताई आंबेकर….

Read More

गळफास घेवून महिलेची आत्महत्या, नांदुरा शहरातील शिक्षक कॉलनी मधील घटना

नांदुरा : ३९ वर्षीय मनोरुग्ण महीलेने घराच्या छताला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ८ जुलै रोजी दुपारी शहरातील शिक्षक कॉलनी या भागात घडली. वर्षा सखाराम अंभोरे असे मृतक महिलेचे नाव आहे. या बाबत शहरातील शिक्षक कॉलनी येथे राहणारे कोठारी महाविद्यालयाचे सेवा निवृत्त शिक्षक सखाराम अंभोरे यांनी नांदुरा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले…

Read More

दुकान बंद करून घरी येत असतांना सायकलस्वाराला अज्ञात वाहणाने उडवले, 60 वर्षीय इसमाचा मृत्यू, मलकापूर तालुक्यातील धानोरा उड्डाणपुलावरील घटना

  मलकापूर :दुकान बंद करून घरी येत असतांना सायकलस्वाराला अज्ञात वाहणाने भरधाव वेगात येऊन पाठीमागून धडक दिली.या अपघातात ६० वर्षीय सायकलस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर धानोरा उड्डाणपुलावर मंगळवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. दिलीप नामदेव तायडे (वय ६०) वर्ष असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. ते तालुक्यातील वाघुड येथे परिवारासह वास्तव्यास आहे.दिलीप नामदेव…

Read More

पत्नीला वाचविण्यासाठी पतीची नदी मध्ये उडी,पुरात वाहून गेल्याने पत्नीचा मृत्यू, पतीचा शोध सुरू, मलकापूर तालुक्यातील हिंगणाकाझी येथील घटना

मलकापूर : सुया, पोथ, मणी विकण्यासाठी हिंगणाकाझी गावात गेलेली महिला व तिचा पती घराकडे परत येत असताना, हिंगणाकाझी गावाजवळ असलेल्या नदीच्या पुरात वाहून गेल्याची घटना ९ जुलै रोजी सायंकाळी घडली. महिलेचा मृतदेह सापडला असून, पतीचा शोध घेण्यात येत आहे. देवधाबा येथील विमल सुभाष शिंदे (वय ५०) ही महिला सुया, पोथ, मणी व इतर वस्तू विकण्यासाठी…

Read More

मलकापुरात चोरीचे सत्र सुरूच, बन्सीलाल नगर मधील एकाच दिवशी तीन घरे फोडली, दाग दागिने, टीव्ही, रोख रक्कम लंपास

मलकापूर : येथील बन्सीलाल नगर परिसरात एकाच रात्री तीन घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील बन्सीलाल नगर, संत एकनाथ मार्ग परिसरात रात्री २ वाजताच्या सुमारास वेगवेगळ्या ठिकाणी तीन घरफोड्या झाल्याची घटना सोमवार, ८ जुलै रोजी घडल्या. यामुळे परीसरातील नागरिकांमध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रीकृष्ण त्रंबक पारसकर यांच्या घरी कोणी नसल्याची संधी…

Read More

डोक्यावर बँकेचे कर्ज ‘कंटाळून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

रिसोड : तालुक्यातील रिठद येथील शेतकरी जिजेबा भुजंगा बोरकर (७०) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज ८ रोजी सकाळी उघडकीस आली. पोलीस सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, जिजेबा बोरकर या शेतकऱ्याकडे अंदाजे पाच एकर जमीन असून या अल्पभूधारक शेतकऱ्यांवर जिल्हा बँकेच्या सेवा सहकारी सोसायटीचे माध्यमातून जवळपास एक लाख ३७ हजार रुपये कर्ज होते….

Read More
error: Content is protected !!