
सोयाबीन खरेदी केली “म्हणे नंतर पैसे देतो,राजूरच्या शेतकऱ्यांची चार लाखांची फसवणूक! पोलिसात गुन्हा दाखल
मोताळा : जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या घटना वाढतच चालल्या आहेत. शेतकऱ्यांना ज्यादा दराचे आमिष दाखवून त्यांच्याकडून माल खरेदी केला जातो नंतर पैसे देण्यास टाळाटाळ केली जाते अशीच एक घटना मोताळा तालुक्यात घडली आहे. राजूर येथील शेतकऱ्यांचे सोयाबीन घेऊन त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करीत चार लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना एक जुलै २०२३ रोजी समोर आली होती….