बारदाना गोदामाला आग, ३० लाखांचे नुकसान; खामगाव शहरातील घटना!
खामगाव: स्थानिक भडगुर्जी जिन भागातील पाडिया यांच्या बारदाना गोदामाला काल पहाटे अचानक आग लागल्याने अंदाजे ३० लाखांचे नुकसान झाल्याची घटना घडली. ही घटना १७ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास घडली. भडगुर्जी जिन भागात “अमेझर ट्रेडिंग कॉर्पोरेशन” या नावाने बारदान्याचे गोदाम आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आगीची माहिती मिळताच नगरपरिषद अग्निशमन दल…
