पुंडलिक ओंकार पाटील यांची माँ नर्मदा ३८०० कि.मी. पायी परिक्रमा पूर्ण; मलकापूरमध्ये जल्लोषात स्वागत

मलकापूर :- श्रद्धा, संयम आणि अखंड भक्तीचा अद्वितीय संगम अनुभवत मलकापूर नगरीतील ज्येष्ठ नर्मदाभक्त पुंडलिक ओंकार पाटील यांनी माँ नर्मदा देवीची तब्बल ३८०० किलोमीटरची पायी परिक्रमा यशस्वीरीत्या पूर्ण केली. तब्बल ८५ दिवसांत ही कठोर परिक्रमा पूर्ण करून त्यांनी मलकापूरचे नाव संपूर्ण नर्मदा परिक्रमा मार्गावर उज्ज्वल केले आहे. माँ नर्मदा देवीच्या कृपेने व “ नमामी देवी…

Read More

संघटित गुन्हेगारीविरोधात बुलढाणा पोलिसांचा निर्णायक प्रहार; मलकापूर खून प्रकरणातील टोळीवर मकोका; जिल्ह्यात खळबळ

मलकापूर :- जिल्ह्यात डोके वर काढत असलेल्या संघटित गुन्हेगारीला कायमचा आळा घालण्याच्या उद्देशाने बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने नववर्षाच्या सुरुवातीलाच मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी मलकापूर येथील गाजलेल्या सतीश झाल्टे खून प्रकरणातील टोळीवर थेट महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाईचे आदेश दिले…

Read More

मलकापूरकरांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास मी कधीही फोल ठरू देणार नाही – नगराध्यक्ष अतीक जवारीवाले

मलकापूर ( दिपक इटणारे ) मलकापूर शहराच्या राजकीय इतिहासात केवळ सत्ता बदल नव्हे, तर दृष्टीकोन बदलणारा निर्णय म्हणून अलीकडील नगरपरिषद निवडणुकीकडे पाहिले जात आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अतीक उर रहमान जवारीवाले यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आणि मलकापूरकरांनी त्यावर शिक्कामोर्तब करत भरभरून जनादेश दिला. ही केवळ निवडणूक विजयाची गोष्ट नसून, जनतेने स्पष्ट,…

Read More

बहापुरा येथील रेल्वे गेट, बेलाड फाटा रस्त्याची दयनीय अवस्था! पीडब्ल्यूडीकडे बहापुर ग्रामस्थांचे निवेदन; धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात!

मलकापूर ( दिपक इटणारे ) :- विकासाच्या गप्पा आणि प्रत्यक्षातील वास्तव यामध्ये प्रचंड दरी असल्याचे चित्र बहापुरा गावात पाहायला मिळत आहे. वडोदा, पान्हेरा आणि सावरगाव या तीन गावांना जोडणारा रेल्वे गेट ते बेलाड फाटा हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता अक्षरशः मृत्युपंथाला लागला असून, या रस्त्यामुळे ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन पुरते विस्कळीत झाले आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्रस्त झालेल्या…

Read More

वाळू माफियांवर कायद्याचा दणका एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई; 12.20 लाखांचा मुद्देमाल जप्त

मलकापूर :- काही दिवसांपूर्वी एमआयडीसी पोलीस व महसूल प्रशासनाने संयुक्त कारवाई करत अवैध वाळू वाहतुकीचे तब्बल आठ टिप्पर पकडून वाळू माफियांना जोरदार धक्का दिला होता. त्या कारवाईची शाई अजूनही सुखलेली नसतानाच, पुन्हा एकदा एमआयडीसी पोलिसांनी कायदा सर्वांसाठी समान आहे, हे ठामपणे दाखवून दिले आहे. कर्तव्यदक्ष ठाणेदार एपीआय नरेंद्र पेंदोर यांच्या नेतृत्वाखाली एमआयडीसी पोलिसांनी दसरखेड एमआयडीसी…

Read More

न्यायालयीन लढा थांबविण्यासाठी धमक्या; मलकापूरात चार जणांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा!

मलकापूर : – ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) शाळेतील नियुक्तीविषयक वाद न्यायालयात प्रलंबित असताना प्रकरण मागे घेण्याचा दबाव टाकत शिक्षकाच्या पतीस जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिक्षकाच्या पत्नीच्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राधाकृष्ण सोसायटी, मलकापूर येथे राहणाऱ्या अॅड. किरण योगेश फासे…

Read More

विजयाचा जल्लोष की कायद्याची पायमल्ली? मतमोजणीनंतर नोटा उधळल्याचा व्हिडीओ व्हायरल; मलकापूरात अतिक जवारीवाले यांच्यावर गुन्हा दाखल

मलकापूर :- नगर परिषद निवडणूक निकालानंतरचा आनंद काहींना कायद्याच्या चौकटीत राहून साजरा करता आला नाही, तर काहींनी विजयाच्या नादात थेट कायद्यालाच आव्हान दिल्याचे चित्र समोर आले आहे. मतमोजणीनंतर विजय उत्सवात खुलेआम नोटा उधळल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मलकापूर शहर पोलिसांनी तत्काळ दखल घेत एकावर मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. नगर परिषद सार्वत्रिक…

Read More

महाराष्ट्राच्या 59व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या स्वेच्छा सेवांचा भव्य शुभारंभ; यावर्षी ऐतिहासिक निरंकारी संत समागम सांगली नगरीत!

  मलकापूर :- ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) सांगली / 28 डिसेंबर, 2025: सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज आणि आदरणीय निरंकारी राजपिता रमित जी यांच्या पावन सान्रिध्यात महाराष्ट्राचा 59वा वार्षिक निरंकारी संत समागम भव्यदिव्य स्वरुपात दिनांक 24, 25 व 26 जानेवारी, 2026 रोजी सांगली ईश्वरपुर रोड, प्रकाश ॲग्रो समोर, लोकरे पेट्रोल पंपा नजिक, सांगलवाडी, सांगली…

Read More

संवेदना प्रतिष्ठान ग्रुपचे सामाजिक कार्य उल्लेखनीय; जनजागृतीतून घडतोय परिवर्तनाचा सूर!

  बुलढाणा :- समाज परिवर्तनाच्या दिशेने सकारात्मक पावले टाकणारा संवेदना प्रतिष्ठान ग्रुप आज राज्यभरात एक आदर्श सामाजिक चळवळ म्हणून ओळखला जात आहे. समाजातील विविध घटकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी हा ग्रुप केवळ भाषणांपुरता मर्यादित न राहता, व्याख्यानमाला, वधू -वर परिचय मेळावे, तसेच गीत गायनाच्या माध्यमातून जनजागृती असे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबवत आहे. ग्रामीण भागातील तरुणाईला…

Read More

तिकीट वाटपातील अन्यायाचा स्फोट; मलकापूर भाजपात राजीनाम्यांची मालिकाच; सच्च्या कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप; शहर उपाध्यक्ष अमोल टप यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

मलकापूर : नुकत्याच पार पडलेल्या नगर पालिका निवडणुकीनंतर मलकापूर भाजपामध्ये अंतर्गत नाराजीचा उद्रेक होत असून, तिकीट वाटपात सच्च्या व मेहनती कार्यकर्त्यांना डावलून केवळ चेहरे व संबंध पाहून उमेदवारी दिल्याचा गंभीर आरोप करत भाजपाचे शहर उपाध्यक्ष अमोल टप यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज, २४ डिसेंबर रोजी, आपल्या पदाचा तसेच पक्षाच्या सक्रीय सदस्यत्वाचा राजीनामा शहराध्यक्ष संतोष…

Read More
error: Content is protected !!