मलकापूर ( उमेश इटणारे ):- बांगलादेशमध्ये माजलेल्या आराजकतेनंतर झालेल्या हिंसाचारात हिंदू अल्पसंख्यांकांच्या घरात लुटमार,तोडफोड,आणि जाळपोळीचा घटना घडल्या आहेत. तेथील झालेल्या घटनेत हिंदूंच्या अत्याचार प्रकरणी देशभरातील विविध हिंदू संघटना पेटून उठल्या आहेत. या घटनेचे पडसाद बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा पाहायला मिळत आहे. आज दि. 20 रोजी बुलढाणा बंद करण्याचे आवाहन विविध हिंदू संघटनांकडून व हिंदू समाज बांधवांकडून करण्यात आले होते. हिंदू समाज बांधवांच्या आव्हानानंतर मलकापूर शहरात सुद्धा बांगलादेशच्या घटनेचा निषेध करत व्यापाऱ्यांकडून आपापले प्रतिष्ठाने बंद ठेवून कळकळीत बंद ठेवण्यात आले आहे.विश्व हिंदू परिषद, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, बजरंग दल,आदी संघटनांच्या बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.