मलकापुरात १० लाखांच्या बदल्यात ४० लाख? प्रकरणाची शहरात जोरदार चर्चा; अधिकृत तक्रार नसल्याने संभ्रम!

 

मलकापूर : – शहरात सध्या १० लाख रुपयांच्या बदल्यात ४० लाख मिळवा अशा आमिषावरून एका नागरिकाची फसवणूक झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. मात्र या संदर्भात मलकापूर शहर पोलिस ठाण्यात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे.
शहरात गेल्या काही महिन्यांत विविध प्रकारच्या आर्थिक फसवणुकीच्या घटना उघड झाल्याने नागरिकांमध्ये आधीच चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच नव्याने समोर आलेल्या या चर्चेमुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही नागरिकांनी मोठ्या रकमेच्या व्यवहाराबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज व्यक्त केली आहे. दरम्यान, पोलिसांकडून अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याने ही घटना प्रत्यक्ष घडली आहे की केवळ अफवा आहे, याबाबत स्पष्टता आलेली नाही. प्रशासनाकडून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही संशयास्पद आर्थिक ऑफर आल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!