‘वाटणी’ लघुपटाची देवगिरी चित्रपट महोत्सवासाठी निवड

 

मलकापूर :- ग्रामीण कौटुंबिक नातेसंबंधांवर भाष्य करणाऱ्या ‘वाटणी’ या लघुपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली मोहोर उमटवली आहे. या लघुपटाची ५ व्या देवगिरी आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव-२०२६ साठी अधिकृत निवड झाली आहे. तसेच बुलढाणा नॅशनल शॉर्टफिल्म फेस्टिवलमध्येही अधिकृत निवड झाली आहे.

अरविंद एंटरटेनमेंट अँड म्युझिक प्रस्तुत हा लघुपट प्रवीण लाड यांची निर्मिती असून, याचे दिग्दर्शन के. एल. आरती यांनी केले आहे.

ग्रामीण भागातील कुटुंबाची वीण, तिथले संघर्ष आणि भावनांचे चित्रण या लघुपटात अत्यंत प्रभावीपणे करण्यात आले आहे. जागतिक स्तरावरील दर्जेदार चित्रपटांच्या स्पर्धेत ङ्गवाटणीच ची निवड झाल्याने मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या यशाबद्दल बोलताना कलाकार, लेखक, दिग्दर्शक प्रवीण लाड म्हणाले, आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे ग्रामीण जीवनातील वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर दाद मिळत आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
मॉडेल, ॲक्टर व दिग्दर्शिका के. एल. आरती यांनी सांगितले की, हा लघुपट केवळ एक कथा नसून, ती एक भावना आहे. या निवडीचे श्रेय माझ्या सर्व तंत्रज्ञ आणि कलाकारांना जाते. हा लघुपट लवकरच येत्या १ मार्चला जळगाव येथे महोत्सवाच्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून, संपूर्ण सिनेसृष्टीतून ‘वाटणी’च्या टीमचे कौतुक होत आहे.

‘वाटणी’ या लघुचित्रपटात मलकापूर व वडनेर भोलजी येथील कलाकारांनी काम केले आहे. संपूर्ण चित्रीकरण हे वडनेर भोलजी येथे झाले असून, या फिल्मचे निर्माते आशिष लाड आहेत. या फिल्मचे दिग्दर्शन के. एल. आरती यांनी केले आहे. चित्रीकरण व संकलन प्रेम खराडे, तर पार्श्वसंगीत सुधीर कुमार यांनी केले आहे. कलाकार भास्कर बावस्कर, शीलाबाई पैठणकर, प्रवीण लाड, शुभम पाटील, अनिता ढाके, वैष्णवी तायडे, सुरज गिऱ्हे यांनी दमदार अभिनयातून या फिल्मला न्याय दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!