मलकापूर तालुक्यातील दाताळा येथे मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी; एकाविरुद्ध गुन्हा

 

मलकापूर :- तालुक्यातील दाताळा येथील एका घरात विद्युत मीटरमध्ये छेडछाड करून गेल्या वर्षभरापासून वीजचोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक अभियंता संदीप मधुकर श्रीधनकर (मलकापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मोहम्मद शाह बादशाह आसखान (वय ६०, रा. इंदिरा नगर, दाताळा) यांच्या घरी तपासणीदरम्यान मीटरची बॉडी उघडून न्युट्रल सीटीची वायर कापलेली तसेच फेज सीटीच्या वायरमध्ये विद्युत अवरोधक जोडल्याचे आढळून आले. त्यामुळे प्रत्यक्ष वापरलेल्या विजेची नोंद कमी होत असल्याचे स्पष्ट झाले.
प्राथमिक अंदाजानुसार, सुमारे १४६१ युनिट्स वीजेची चोरी करण्यात आली असून त्याची किंमत अंदाजे २८ हजार ४७० रुपये आहे. यासोबतच तडजोड रक्कम २ हजार रुपये धरून एकूण ३० हजार ४७० रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि संदीप गोंड यांच्या
मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!