मलकापूर तालुक्यातील उमाळी येथे आकोडा टाकून वीजचोरी; एकाविरुद्ध गुन्हा

 

मलकापूर :- तालुक्यातील उमाळी येथे लघुदाब विद्युत वाहिनीवर थेट आकोडा टाकून वीजचोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक अभियंता संदीप मधुकर श्रीधनकर (मलकापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, प्रल्हाद राजाराम सातव (वय ६०, रा. उमाळी) यांच्या राहत्या घरी तपासणीदरम्यान सुमारे २० फुट लांबीची काळ्या रंगाची वायर वापरून लघुदाब वाहिनीवर थेट जोडणी करण्यात आल्याचे आढळून आले. यामार्फत बेकायदेशीररीत्या वीज वापर केली जात होती.
तपासाअंती गेल्या सुमारे १२ महिन्यांपासून वीजचोरी सुरू असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकारात अंदाजे २१६ युनिट्स वीजेचा वापर नोंदविला गेला नसून, त्याची किंमत सुमारे ६ हजार २४० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच तडजोड रक्कम २ हजार रुपये धरून एकूण ८ हजार २४० रुपयांचा आर्थिक तोटा झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी कलम १३५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सपोनि संदीप गोंडाने यांच्याकडे देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!