चोरट्यांमुळे दाताळा गाव अंधारात; चोरट्यांनी असं काय केलं?

 

मलकापूर :- तालुक्यातील दाताळा शिवारात अज्ञात चोरट्यांनी महावितरणच्या दोन डीपींवरील सुमारे ३००० मीटर लांबीची अॅल्युमिनियम विद्युत तार चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १५ फेब्रुवारीच्या रात्री १० वाजेपासून ते १६ फेब्रुवारीच्या पहाटे ६ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही चोरी घडली. गावकरी व शेतकरी झोपेत असताना चोरट्यांनी दाताळा शिवारातील पी.आर. मास्तर डीपी आणि श्रीराम डीपी या दोन वीज वितरण केंद्रांना लक्ष्य केले. दोन्ही ठिकाणांहून एकूण १५ गाळ्यांमधील अंदाजे ३००० मीटर लांबीची एलटी अॅल्युमिनियम तार कापून नेण्यात आली. चोरी गेलेल्या तारांची किंमत सुमारे ४० हजार रुपये असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. सकाळी वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. या संदर्भात दाताळा वितरण केंद्राचे सहाय्यक अभियंता संदीप मधुकर श्रीधनकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून मलकापूर ग्रामीण पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळू टाकरखेडे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!