लग्न मिरवणुकीत डीजेवरून वाद; १२ ते १३ जणांविरुद्ध गुन्हा! खामगाव तालुक्यातील घटना

खामगाव :- तालुक्यातील जयपूर लांडे येथे लग्नाच्या मिरवणुकीदरम्यान डीजेवरील गाण्याच्या कारणावरून वाद निर्माण होऊन मारहाणीची घटना घडली. या प्रकरणी खामगाव शहर पोलिस ठाण्यात १२ ते १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सुमारे ९ वाजताच्या दरम्यान लग्नाची मिरवणूक सुरू असताना डीजेवरील गाण्याच्या मुद्द्यावरून दोन गटांमध्ये वाद झाला. हा वाद वाढत जाऊन त्याचे रूपांतर मारहाणीत झाले.
या घटनेत काहींना दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी परमेश्वर गोपाल बेलोकार (वय ३२, रा. जयपूर लांडे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!