मलकापूर : – तालुक्यातील हरसोडा गावात एका ५१ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. मृत व्यक्तीचे नाव वाल्मीक पंढरी झाल्टे (रा. हरसोडा) असे आहे. प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री त्यांनी घराच्या छताला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे समोर आले आहे. रविवारी सकाळी हा प्रकार लक्षात आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. घटनेमागील कारणांचा शोध घेतला जात आहे.