डोणगाव शिवारात 45 वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात खळबळ

डोणगाव : मेहकर तालुक्यातील डोणगाव शिवारात शनिवारी सकाळी एका ४५ वर्षीय इसमाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष परसराम बोरकर (रा. डोणगाव, ता. मेहकर, जि. बुलडाणा) यांनी गजानन सखाराम पांडव यांच्या शेतातील टीनपत्र्याच्या शेडमध्ये दोरीच्या साहाय्याने जीवन संपविले. ही घटना सकाळी सुमारे ११.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

याबाबत निवृत्ती रावभान बोरकर (रा. जवळा, ता. मेहकर) यांनी पोलिसांत माहिती दिली आहे. घटनेची नोंद करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तपासानंतरच अधिक माहिती समोर येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!