धाडमध्ये गुंडगिरीला आळा बसणार? आरोपींची पोलिसांकडून धिंड

 

बुलढाणा : – धाड परिसरात व्यावसायिकांना धमकावून हप्ता उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. संबंधित आरोपींना सोमवारी गावातील मुख्य मार्गावरून फिरवून कायद्याचा धाक दाखवण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील दुधा येथील पवन राजेंद्र सोनुने हे धाड येथे औषधांचे दुकान चालवितात. ६ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे साडेतीन वाजता ते दुकानाकडे जात असताना चौघांनी त्यांना अडवून दमदाटी केली व हप्ता मागितला. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
सोनुने यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. तपासादरम्यान इतर काही व्यावसायिकांनाही अशाच प्रकारे धमकावण्यात आल्याची माहिती पुढे आली. या प्रकरणी अक्षय बिलांगे, रौशन शिंदे आणि राहुल दळवी यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आरोपींना गावातून फिरवून कठोर संदेश दिला असून, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पुढील कारवाई सुरू असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!