सकाळी शेतात गेले, रात्री मृतदेह सापडला! ढासळवाडी येथील शेतकऱ्यासोबत नेमकं काय घडलं?
पिंपळगाव सराई : – ढासळवाडी येथील ४७ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेलेले संतोष दळवी हे घरी परतले नाहीत, त्यानंतर शोध घेतला असता ही घटना उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष दळवी हे १६ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे सहा वाजता स्वतःच्या शेतात पाणी देण्यासाठी गेले होते. संध्याकाळपर्यंत…
