वादळी वाऱ्यामुळे झाड पडून घर जमीन दोस्त झाले, आई – वडील गंभीर जखमी झाले, तीन गुरे दगावली, सहा महिने उलटूनही वाघमारे कुटुंबाला शासकीय मदतीची प्रतिक्षा

मलकापूर,( उमेश ईटणारे ) दि. 23 डिसेंबर 2024: मलकापूर तालुक्यात 26 मे 2024 रोजी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे घिर्णी भाग 1 येथील मनोहर शंकर वाघमारे यांचे कुटुंब मोठ्या आर्थिक आणि मानसिक संकटात सापडले आहे. वडाचे मोठे झाड त्यांच्या घरावर कोसळून संपूर्ण घर जमीनदोस्त झाले. या दुर्घटनेत तीन गुरांचा मृत्यू झाला, तर मनोहर वाघमारे व त्यांच्या पत्नी…

Read More

घुसर फाट्याजवळ भीषण अपघात: काळी पिवळी व स्विफ्ट गाडीचा समोरासमोर धडक; तिघे जखमी

मलकापूर: आज (24 डिसेंबर) सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घुसर फाट्याजवळ भीषण अपघात झाला. काळी पिवळी प्रवासी वाहन (एम एच 28 एच 1077) व स्विफ्ट चारचाकी वाहन यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात काळी पिवळी वाहनातील दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले असून स्विफ्ट वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने बुलढाणा येथे उपचारासाठी हलवण्यात आले…

Read More

शेतकऱ्यांच्या तुरीच्या पिकाला अज्ञात व्यक्तीने लावली आग, एक एकर पिक जळून खाक, हजारोंचे नुकसान! मलकापूर शहरातील घटना

  मलकापूर, १९ डिसेंबर: दळाचा मारोती शिवारात शेतातील उभ्या तुरीच्या पिकाला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने मोठे नुकसान झाले आहे. या आगीत सुमारे एक एकर तुरीचे पीक पूर्णतः जळून खाक झाले असून, शेतकऱ्यांना २५ ते ३० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.प्राप्त माहितीनुसार, शेतकरी अशोक सूर्यवंशी (पाटील) आणि प्रकाश सूर्यवंशी (पाटील) यांच्या शेतातील उभ्या…

Read More

आंतरराष्ट्रीय पातळीवर कोलते महाविद्यालय इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स मार्फत ‘इंजिनिअरिंग एक्सलन्स अवॉर्ड’ नी पुरस्कारीत

  मलकापूर: इंस्टीट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) आयईआय ही भारतातील एक प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक बहुविषयक व्यावसायिक अभियांत्रिकी संस्था आहे. ही संस्था 1920 साली स्थापन झाली असून तिचे मुख्यालय कोलकाता येथे आहे. गेल्या शतकामध्ये, आयईआय ने अभियांत्रिकी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. भारतभर 124 केंद्रे, 6 परदेशी अध्याय, 7 विशेष मंचे, आणि 15 अभियांत्रिकी शाखांचा समावेश असलेल्या…

Read More

पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय मलकापूर येथे संत गाडगेबाबा पुण्यतिथी उत्साहात साजरी

  मलकापूर : दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथे वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी अत्यंत श्रद्धा आणि उत्साहाने साजरी करण्यात आली. संत गाडगेबाबा यांनी समाजसेवेचा आदर्श घालून दिला असून त्यांच्या स्वच्छता अभियान, शिक्षणासाठी घेतलेले योगदान आणि समाज सुधारण्यासाठी केलेल्या कार्यामुळे ते कायमच प्रेरणादायी ठरले आहेत. कार्यक्रमाची सुरुवात…

Read More

संत गाडगेबाबांचा खरा इतिहास समाजासमोर आणणे गरजेचे- डॉ.बालाजी जाधव

  मलकापूर :- आपण जुन्या रूढी व परंपरांना फाटा देत विज्ञाननिष्ठ बाबींना अंगीकारून शिक्षणाला महत्व द्यावे, आजच्या या धकाधकीच्या जिवनात शिक्षणच तुम्हाला तारणार आहे. या सोबतच गाडगेबाबांचा खरा इतिहास हा नवीन पिढीसमोर येणे गरजेचे असल्याचे मत गाथा चिंतन ट्रस्ट संभाजी नगरचे अध्यक्ष डॉ.बालाजी जाधव यांनी राष्ट्रसंत गाडगे महाराज पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त व्यक्त केले. सर्वभाषिक परिट (धोबी)…

Read More

“व्यसनमुक्त जीवनाचा संदेश देणारी पोस्टर व स्लोगन स्पर्धा चांडक विद्यालयात संपन्न”

  मलकापूर: नगर सेवा समिती मलकापूर संचलित लिलाधर भोजराज चांडक विद्यालयात संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि. 20 डिसेंबर 2024 रोजी पोस्टर मेकिंग व स्लोगन स्पर्धा आयोजित करण्यात आली. विज्ञान शिक्षिका सौ. राजश्री कुसुबे यांच्या मार्गदर्शनाखाली सातवी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ. जयंत राजूरकर यांच्या हस्ते संत गाडगे बाबांच्या…

Read More

दोन ट्रकांची समोरासमोर धडक; दोघे जखमी, मलकापूर शहरातील घटना!

मलकापूर : मलकापूर शहराजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर हॉटेल सूर्या नजीक दोन ट्रकांची समोरासमोर धडक झाल्याने मोठा अपघात घडला. ही घटना 19 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता घडली. या अपघातात दोघेजण जखमी झाले असून वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका मालवाहतूक ट्रक आणि भारत पेट्रोलियम कंपनीच्या ट्रकाची समोरासमोर जोरदार टक्कर झाली. धडक…

Read More

“पोलीस फक्त रक्षकच नव्हे, तर माणुसकीचे प्रतीकही!” मलकापूर ग्रामीणचे ठाणेदार संदीप काळे यांचा थंडीतील माणुसकीचा दीप: बेघरांना दिला उबदार आधार

मलकापूर( दिपक इटणारे ):- कडाक्याच्या थंडीत अनेकांच्या अंगावर शाल असते, पण काहीजणांना उबही मिळत नाही. अशा परिस्थितीत मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माणुसकीचा झरा जागवला. पेट्रोलिंगच्या दरम्यान रस्त्यावर उघड्यावर झोपलेली बेघर चिमुकली मुले आणि वृद्ध त्यांना दिसले. थंडीने गारठलेल्या या व्यक्तींकडे स्वत:ला उब देण्यासाठी कोणताच आधार नव्हता. ही हृदयस्पर्शी…

Read More

आयशर ट्रकच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू; मलकापूर शहरातील घटना!

  मलकापूर :- शहरातील पंचमुखी हनुमान मंदिराजवळ आज, 18 डिसेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास एक अपघाताची घटना घडली. एचडीएफसी बँकेसमोर घडलेल्या या दुर्घटनेत, मालवाहू आयशर ट्रकने निष्काळजीपणे व भरधाव वेगाने सायकलस्वाराला धडक दिली.या अपघातात सईद अहमद अब्दुल कादर (वय 60, रा. माळीपुरा, मलकापूर) यांचा मृत्यू झाला आहे. शहर पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत आयशर…

Read More
error: Content is protected !!