पहूरजिरा येथील एकाच रात्री ३ घरे फोडून चोरट्यांचा धुमाकूळ; ९५ हजारांचा मुद्देमाल लंपास
जलंब : तालुक्यातील पहूरजिरा गावात अज्ञात चोरट्यांनी धाडसी कृत्य करत एकाच रात्री सलग तीन घरांमध्ये चोरी करून तब्बल ९५ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना १० एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जलंब पोलीस स्टेशन हद्दीतील पहूरजिरा ता. शेगाव येथे…
