Headlines

बुलढाणा जिल्ह्याच्या तीन खेळाडूंची महाराष्ट्र नेटबॉल संघात निवड

मलकापूर :- नेटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत २३ ते २६ फेब्रुवारी २०२५ दरम्यान हरियाणा (भिवणी) येथे होणाऱ्या राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धासाठी महाराष्ट्र संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या संघात ज्युनियर गटातील मुले व मुली खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. धुळे येथे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्याने सहभाग घेतला

होता. या स्पर्धेत मलकापूर च्या ज्युनियर मुलीच्या गटातुन रोशनी नितीन बढे,मानसी सुनिल शेलकर यांची निवड झाली तसेच ज्युनियर मुलाच्या गटातुन सोहम आशिष देशपांडे यांची महाराष्ट्र संघासाठी निवड करण्यात आली. एवढेच नव्हे तर महाराष्ट्राची उप कर्णधार पदी मानसी शेलकर ईची निवळ करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्य नेटबॉल संघाचे सचिव श्याम देशमुख सर नेटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया निरक्षक मनीष पटेल सर यांनी या सर्व खेळाडूंची अधिकृतरीत्या निवड जाहीर केली. महाराष्ट्र राज्य ज्युनियर गटाच्या संघ व्यस्थापकपदी क्रीडा शिक्षक मयुर गवात्रे यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या सर्व राष्ट्रीय खेळाडूंना संघर्ष क्रीडा मंडळ मलकापूर तसेच बुलढाणा जिल्हा नेटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष श्री . किशोरभाऊ नवले ,भूपत रुपारेलिया यांनी विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या किशोर भाऊ नवले यांनी खेळाडूंना प्रोत्साहित संबोधित करताना केवळ जिल्ह्याचे नव्हे तर संपूर्ण राज्याचे नाव राष्ट्रीयस्तरावर लौकिक करावे. व पालकांचे व प्रशिक्षण कर्त्या गुरूचे नाव जगाच्या पाठीवर लौकिक करावे असे प्रतिपादन केले नेटबॉल खेळाचे प्रशिक्षण (कॅम्प) १८ ते २१ फेब्रुवारी २०२५ पासुन दसरा मैदान भंडारा येथे सुरू आहे. महाराष्ट्र संघ दिनांक २१ फेब्रुवारी २०२५ रोजी नागपूर वरून रवाना होईल . आणि त्यानंतर हरियाणा (भिवनी) साठी येथे स्पर्धेसाठी उपस्थित राहील. बुलडाणा जिल्हा सचिव श्री मयुर गवात्रे , अमोल उरसवाल सहसचिव विक्रांत नवले उमेश हीरुळकर , प्रफुल बाबर सचिन ढोले, संदीप वैष्णव गणेश तायडे दिनेश राठोड विनायक क्षीरसागर सतीश दहिभाते रितेश दहिभाते अक्षय भन्साली यांनी निवड झालेल्या खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धसाठी शुभेच्छा दिल्या..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!