अश्लील व्हिडिओची धमकी देत विवाहितेवर वारंवार अत्याचार आरोपीविरुद्ध बलात्कार व अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल

 

मेरा बु. : अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एका २५ वर्षीय विवाहितेवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार व अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
तक्रारीनुसार, पीडित महिला मजुरीसाठी शेतात एकटी जात असताना आरोपीने तिचे मोबाईलमध्ये फोटो काढले. याबाबत जाब विचारल्यावर आरोपी निघून गेला. मात्र दुसऱ्याच दिवशी आरोपीने पुन्हा शेतात जाऊन तिचा हात धरत मोबाईलमध्ये व्हिडिओ काढला आणि हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर आरोपीने अश्लील फोटो व व्हिडिओ दाखवून पीडितेला वारंवार धमकावत तिच्यावर अत्याचार सुरू ठेवले. सन २०२४ मध्ये पीडिता माहेरी गेली असता आरोपीने तिचे फोटो आईला दाखविण्याची धमकी देत पुन्हा अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच ९ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे ११ वाजता आरोपीने गावातील एका शेतकऱ्याच्या मकाच्या शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच ही बाब नवऱ्याला सांगितल्यास नवरा व मुलाला ठार मारण्याची धमकी दिल्याचे पीडितेने सांगितले.
पीडित महिलेच्या तक्रारीवरून अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी शादाब खान सखावत खान (रा. मेरा खुर्द) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६४, १२६(२), ३५१(२) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!