सर्प पकडताना वयोवृद्ध सर्पमित्राचा मृत्यू; इतरांच्या सुरक्षिततेसाठी धावणारा धाडसी जीव अखेर सर्पदंशाला बळी; मलकापूरात हळहळ
मलकापूर : शहरातील नागरिकांना सर्पांच्या भीतीतून मुक्त करून सुरक्षित झोप मिळावी म्हणून अनेक वर्षे जीव धोक्यात घालून सेवा करणारे ज्येष्ठ सर्पमित्र नामदेव विश्वनाथ उज्जैनकार (रा. यशोधाम कॉलनी, मलकापूर) यांचा सर्पदंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवार, १३ मार्च रोजी मध्यरात्री सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण मलकापूर शहरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ…
