पोलिस वर्दीचे स्वप्न अपुरेच; सरावादरम्यान तरुणाचा दुर्दैवी मृत्यू! आई-वडिलांचा एकुलता एक दीपक काळाच्या पडद्याआड

  मेहकर :- मोठी स्वप्ने पाहणाऱ्या आणि त्यासाठी जिद्दीने परिश्रम करणाऱ्या सारशिव येथील १९ वर्षीय दीपक रामदास जाधव याचा धावण्याच्या सरावादरम्यान अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १२ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली. या घटनेने संपूर्ण परिसर हळहळला आहे. मुंबई पोलिस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून दीपक नियमितपणे सारशिव फाटा ते मंगरूळ नवघरे परिसरात धावण्याचा सराव…

Read More

अभ्यासिका इमारतीला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याच्या प्रस्तावास नप सभेत एकमताने मंजुरी; बहुजन उद्धारक सेवा समितीच्या पाठपुराव्याला यश

मलकापूर:- नगर परिषदेच्या अखत्यारीतील चाळिबिघा परिसरात नव्याने उभारण्यात येत असलेल्या अभ्यासिका इमारतीला ‘ ज्ञानज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ हे यांचे नाव देण्याच्या प्रस्तावास नप सदस्यांनी सर्वानुमते मंजुरी दिली. छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दि. १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. बहुजन उद्धारक सेवा समितीच्या वतीने मागील तीन वर्षांपासून सातत्याने करण्यात येत…

Read More

आंतरजिल्हा घरफोडी टोळी जेरबंद; अकोल्यातील गुन्ह्यांचीही उकल, बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; ६.८६ लाखांचा मुद्देमाल जप्त!

बुलढाणा : – शेगाव शहर व परिसरात घरफोडी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. आरोपींकडून सोन्याचे दागिने, कार व मोबाईल असा एकूण ६ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शेगावसह अकोला जिल्ह्यातील दोन घरफोडींचीही उकल झाली आहे. शेगाव येथील माऊलीनगर परिसरात राहणाऱ्या धीरजकुमार…

Read More

गस्तीवर असलेल्या पोलिसाशी गैरवर्तन; तिघांवर गुन्हा दाखल

  मेहकर :- शहरातील वाटिका चौक परिसरात गस्तीदरम्यान पोलिस कर्मचाऱ्याशी धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना बुधवारी (दि. ११) रात्री घडली. या प्रकरणी मेहकर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस कॉन्स्टेबल शिवाजी श्रीराम चिमण (वय ३०) हे नियमित गस्त घालत असताना एमएच-२८-बीएच-६६६८ क्रमांकाच्या दुचाकीवर तिघेजण ट्रिपल सीट आरडाओरड करत जात असल्याचे आढळले….

Read More

अल्पवयीन मुलीला पळविण्याचा प्रयत्न; तरुण अटकेत

  जळगाव जामोद :- तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी एका तरुणास अटक केली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी शाळेकडे जात असताना चौभारा परिसरातील अतुल गजानन दातीर (वय २२) याने तिला दुचाकीवर बसवून नेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मात्र, परिसरातील नागरिकांनी तत्काळ पाठलाग करून त्याला…

Read More

घरातून सकाळी निघाली… अन् परतलीच नाही! वडोद्यातील २० वर्षीय तरुणी बेपत्ता; पोलिसांत मिसिंग दाखल

मलकापूर : तालुक्यातील वडोदा परिसरातून एक २० वर्षीय तरुणी अचानक बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सकाळी घरातून कोणालाही न सांगता बाहेर पडलेली ही तरुणी अद्याप परत न आल्याने कुटुंबीय चिंतेत असून मलकापूर ग्रामीण पोलीस ठाणे येथे मिसिंगची नोंद करण्यात आली आहे. याबाबत कमलेश कोल गणपत कोल (रा. अडगाळ, ता. रामपूर, जि. सिधी, मध्य प्रदेश;…

Read More

प्रेमसंबंधाच्या कारणावरून दोन कुटुंबांत तणाव; मुलासह आईवर हल्ला, १३ जणांविरुद्ध गुन्हा

खामगाव : प्रेमसंबंधाच्या कारणावरून तालुक्यातील पेंडका पातोंडा येथे दोन कुटुंबांमध्ये तीव्र वाद निर्माण होऊन मुलासह त्याच्या आईवर लोखंडी रॉड व काठीने हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नारायण मोरखडे रा. गोळेगाव…

Read More

परीक्षेला जाताना काळाचा घाला; २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू

  चिखली : – चिखली मार्गावरील हातणी परिसरात १२ फेब्रुवारी रोजी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास ट्रक आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मृत तरुणाचे नाव शंतनू नारायण अंभोरे (वय २३, रा. एकलारा) असे असून तो परीक्षेसाठी जात असल्याचे समजते. अपघाताची माहिती मिळताच पीएसआय गाढे यांनी पथकासह…

Read More

हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; १ लाखांच्या मागणीसाठी मारहाण, जिवे मारण्याची धमकी; पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा

बुलढाणा : लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच हुंड्यासाठी एक लाख रुपयांची मागणी करत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. फातिमा शेख दानिश (वय २१, रा. इकबाल नगर,…

Read More

अवैध हातभट्टी दारूवर बुलढाणा ग्रामीण पोलिसांचा छापा; १७ हजारांचा मुद्देमाल जप्त

बुलढाणा : जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मितीला आळा घालण्यासाठी बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई करत गोंधनखेड शिवारात सुरू असलेला हातभट्टी दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला. या छाप्यात सुमारे १७ हजार २५० रुपयांचा मोहा सडवा, तयार दारू व साहित्य जप्त करण्यात आले असून वरवंड येथील ५१ वर्षीय इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा ग्रामीण…

Read More
error: Content is protected !!