हातातोंडाशी आलेला घास अज्ञात भामट्याने जाळून हिरावला! मडाखेड खु. शिवारात तुरीच्या गंजीस आग; शेतकऱ्याचे सुमारे अडीच लाखांचे नुकसान
जळगाव जामोद : दिवसरात्र राबून, उन्हातान्हात घाम गाळत उभं केलेलं पीक… कर्ज, खर्च आणि घरच्या गरजांचा हिशेब मनात धरून शेतकऱ्याने साठवलेली मेहनत… आणि नेमक्या काढणीच्या काळात हातातोंडाशी आलेला घास अज्ञात भामट्याने जाळून हिरावून घेतल्याची संतापजनक घटना मडाखेड खुर्द शिवारात घडली आहे. मडाखेड खु. येथील शेतकरी नितीन नारायण गायकवाड (वय ५२) यांची शेतशिवार गट क्रमांक ५०…
