Headlines

सर्वसामान्य कुटुंबातील युवा उमेदवार सागर जैस्वाल पंचायत समितीच्या रिंगणात

मलकापूर :राजकारणात आजही आर्थिक बळ आणि सत्तेची समीकरणे प्रभावी मानली जात असताना, त्या प्रवाहाला छेद देत सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेला, कोणताही राजकीय वारसा नसलेला एक युवा चेहरा थेट निवडणूक रिंगणात उतरतो आहे. मलकापूर ग्रामीण पंचायत समिती सदस्य पदासाठी युवा सामाजिक कार्यकर्ता सागर मनोज जैस्वाल हे आगामी निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहणार असल्याची चर्चा सध्या ग्रामीण…

Read More

संगणक शिक्षणाच्या आड लैंगिक छळाचा घृणास्पद प्रकार; क्लासरूमच बनली तरुणींसाठी असुरक्षित; मलकापूरातील धक्कादायक घटना

मलकापूर :जिथे भविष्यासाठी कौशल्य घडवलं जातं, तिथेच तरुणींच्या सन्मानावर हात घालण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मलकापूरमधील एका संगणक प्रशिक्षण संस्थेत शिकायला गेलेल्या तरुणीचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच शहरात खळबळ उडाली आहे. शिक्षण संस्थेच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या या प्रकरणात संबंधित व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात…

Read More

तरुण पिढीने व्यसनांपासून दूर राहून देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे; प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. रोकडे यांचे आवाहन

तालुका विधी सेवा समिती व वकील संघ मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. कोलते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ‘ड्रग्ज फ्री इंडिया’ जनजागृती शिबीर उत्साहात मलकापूर (प्रतिनिधी) : आजच्या स्पर्धात्मक आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे वळत असल्याचे चित्र चिंताजनक आहे. व्यसनांचे दुष्परिणाम केवळ व्यक्तीपुरते मर्यादित न राहता कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीस अडथळा ठरतात. त्यामुळे तरुणांनी सजग राहून…

Read More

‘मी शेताकडे जातो’ म्हणत घराबाहेर पडला आणि परतलाच नाही; ऑटोचालकाची हत्या; धरणगावचा ऑटोचालक मृत्यू प्रकरणी आरोपी १२ तासांत गजाआड

मलकापूर:- तालुक्यात खळबळ उडवणाऱ्या धरणगाव (ता. मलकापूर) येथील ऑटोचालक अमोल भाऊराव भवरे (वय ३५) यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला अखेर वेगळी कलाटणी मिळाली आहे. सुरुवातीला मर्ग म्हणून नोंद झालेल्या या घटनेचा सखोल तपास करत दसरखेड एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत खुनाचा पर्दाफाश करत आरोपीला बेड्या ठोकल्या. या कारवाईमुळे परिसरात पोलीस तपासाबाबत समाधान व्यक्त केले जात आहे….

Read More

दसरखेड टोलनाक्यावर अवैध वाळू वाहतूक; टिपर जप्त, एकावर गुन्हा दाखल

मलकापूर:- तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीचा सुळसुळाट वाढत असताना दसरखेड टोलनाका परिसरात एमआयडीसी मलकापूर पोलिसांनी धडक कारवाई करत अवैध वाळू वाहून नेणारा टिपर जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे 12 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी मलकापूर (दसरखेड) पोलीस ठाण्यात कलम 303(2) BNS सह कलम…

Read More

रायझिंग डे सप्ताहानिमित्त मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम

मलकापूर:- मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने रायझिंग डे अर्थात पोलीस वर्धापन दिन सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये कायदा-सुव्यवस्था, सुरक्षितता व पोलीस यंत्रणेच्या कार्याबाबत जागृती करण्याच्या उद्देशाने विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून पोलीस व नागरिक, विशेषतः विद्यार्थी यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दि. 06 जानेवारी 2025 रोजी पोलीस स्टेशन मलकापूर ग्रामीण…

Read More

उपजिल्हा रुग्णालयातील यशस्वी डायलिसिस सेंटरमुळे रुग्णांना दिलासा; डॉक्टरांचा सत्कार

मलकापूर : तालुक्यातील मूत्रपिंड विकाराने त्रस्त रुग्णांसाठी जीवनरक्षक ठरत असलेले मलकापूर उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सेंटर आज आरोग्यसेवेचा महत्त्वपूर्ण आधार बनले आहे. याआधी डायलिसिससाठी बाहेरगावी धावपळ करणाऱ्या रुग्णांना आता स्थानिक पातळीवर दर्जेदार उपचार मिळू लागल्याने त्यांचा वेळ, खर्च व मानसिक त्रास मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. या यशस्वी आणि रुग्णाभिमुख सेवेसाठी रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा सत्कार…

Read More

५३व्या बुलढाणा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत नूतन इंग्लिश स्कूलचा प्रथम क्रमांक

मलकापूर:- मलकापूर तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरणारी बातमी समोर आली असून नूतन इंग्लिश स्कूलने जिल्हास्तरावर आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. विज्ञान, नवकल्पना आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुरेख संगम साधत शाळेच्या विद्यार्थिनींनी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत प्रथम क्रमांक पटकावून मलकापूरचे नाव उज्वल केले आहे. विवेकानंद विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, हिवरा आश्रम येथे आयोजित ५३व्या बुलढाणा…

Read More

अल्पवयीन युवतीवर अत्याचार; तरुणाविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल; मलकापूर तालुक्यातील घटना!

  मलकापूर :- ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) तालुक्यात खळबळ उडवणारा प्रकार समोर आला असून, १७ वर्षीय अल्पवयीन युवतीवर शारीरिक अत्याचार झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात करण दादाराव वानखेडे (वय १९, रा. वरखेड) याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित युवतीला वेगवेगळ्या…

Read More

मलकापूरच्या जलसुरक्षेसाठी नगराध्यक्ष स्वतः मैदानात; धुपेश्वर येथील पूर्णा नदीवर नगराध्यक्ष अतिकभाई जवारीवाले यांची सखोल पाहणी

मलकापूर (दिपक इटनारे ):शहराचा विकास केवळ इमारतींनी नव्हे, तर नागरिकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण झाल्यावरच खऱ्या अर्थाने साध्य होतो. त्यातील सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा. मलकापूरकरांना या मूलभूत सुविधेची कोणतीही कमतरता भासू नये, यासाठी नगराध्यक्ष अतिकभाई जवारीवाले यांनी प्रशासनावर अवलंबून न राहता स्वतः पुढाकार घेत धुपेश्वर येथील पूर्णा नदी व पाणीपुरवठा व्यवस्थेची प्रत्यक्ष…

Read More
error: Content is protected !!