मलकापूर:- दोन अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवून नेल्याची घटना 17 ऑगस्ट रोजी समोर आली आहे.याप्रकरणी 18 ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की दोन्ही अल्पवयीन मुली आम्ही दुकानात जातो असे सांगून घरून निघून गेल्या बराच वेळ होऊन सुद्धा घरी न परतल्याने शेजारी व नातेवाईकांना विचारपूस केली असता आढळून आले नाही.
या बाबत अल्पवयीन मुलींच्या आईने पोलीस स्टेशन मध्ये धाव घेत तक्रार नोंदवली. दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी 403 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. अमोल शेले करीत आहे. अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी त्यांच्या पालकांचे रखवालीतून फूस लावून पळवून नेल्याचा आरोप तक्रारारीत केला आहे.