मलकापूर : मलकापूर रेल्वे स्टेशनवर आज (11 फेब्रुवारी) दुपारी पाच वाजता एका अनोळखी तरुणाने रेल्वेखाली उडी मारून आ-त्म-ह-त्या केल्याची घटना घडली. अचानक घडलेल्या या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, युवकाने महाराष्ट्र एक्सप्रेस येत असताना रेल्वे रुळांवर उडी घेतली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा कर्मचारी व पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. युवक गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला आणि त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून त्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच आ-त्म-ह-त्ये-चे कारण अस्पष्ट असल्याने पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे काही काळ रेल्वे वाहतूक प्रभावित झाली होती. मलकापूर रेल्वे स्थानकावर घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे
मलकापूर रेल्वे स्टेशनवर अज्ञात तरुणाची आ-त्म-ह-त्या, ओळख पटविण्याचे रेल्वे पोलिसांचे आवाहन; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
