Headlines

घरगुती वादातून पतीचा-पत्नीवर ब्लेडने हल्ला, भुसावळ पोलिसात गुन्हा दाखल!

भुसावळ – कौटुंबिक वादाचे गंभीर रूप घेत पतीने पत्नीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना पंचशील नगर येथे घडली. या हल्ल्यात विवाहिता गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

३ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पंचशील नगर येथे शबनम बी वसीम शहा (वय २१) या तरुणीवर तिचा पती वसीम शहा बरकत शहा याने हल्ला केला. दोघांमध्ये कौटुंबिक वाद उफाळल्यानंतर वसीम शहा याने पत्नीला शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यानंतर संतापाच्या भरात त्याने धारदार ब्लेडने तिच्या गळ्यावर आणि डाव्या हातावर वार केले.
या घटनेनंतर जखमी शबनम बी शहा यांनी भुसावळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार, पोलिसांनी वसीम शहा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमितकुमार बागुल या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!