खामगाव :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2024 या वर्षाचा निकाल सोमवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. यात शेलोडी येथील जागृती ज्ञानपीठची विद्यार्थीनी, पिंप्राळा येथील रहिवासी कु. दिव्या सुभाष ठोसर हिने इयत्ता दहावीच्या परिक्षेत ८९.८० टक्के गुण घेवून उत्तीर्ण झाली आहे. दिव्या ही ग्रामीण भागातील असून तिला कोणतेही क्लास न लावता तिने अभ्यासाचे जोरावर चांगले गुण घेत उत्कृष्ट यश संपादन केले आहे.दिव्याचे वडील शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. शेतीवरच ते मुलींचे शिक्षण करतात.दिव्याने ग्रामीण भागात राहून सुद्धा चांगले गुण प्राप्त केल्याने याबद्दल कु.दिव्या ठोसर हिचे सर्वत्र कौतुक होत आहे.