मलकापूर:- आज सकाळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर वडी फाट्याजवळ रस्ता क्रॉस करत असताना एक भीषण अपघात झाला. ट्रक आणि ट्रॅक्टरच्या या धडकेत एक महिला जागीच ठार झाली, तर तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना आज दि. 29 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास घडली
हा अपघात सकाळी घडला, परंतु अद्याप मृत महिलेचे नाव समजू शकलेले नाही. अपघाताच्या वेळी ट्रॅक्टरमध्ये १० ते १५ महिला मजूर असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्या सर्व महिला नांदुरा तालुक्यातील वडी गावातील रहिवासी आहेत. जखमी महिलांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.