मलकापूर दि.२१) येथील तालुका क्रीडा संकुल चे मैदानावर १०वा आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न झाला.या प्रसंगी प्रत्येकाला तणावमुक्त आयुष्य जगणेसाठी योगाचे महत्व पटवून देण्यात आले.तालुका संकुल समितीचे अध्यक्ष तथा आमदार राजेश एकडे यांचे मार्गदर्शन खाली तसेच जिलधिकारी डॉ किरण पाटील यांनी केलेल्या आवाहननुसार योगदिनानिमित्त मोठ्याप्रमाणावर नागरिक व खेळाडूंनी उपस्थिती दिली.कार्यक्रम आयोजित करण्यासाठी उपविभागीय अधीकारी संतोष शिंदे,प्र.तहसीलदार श्रीकृष्ण उगले यांनी नियोजन करणेसाठी मोलाचे सहकार्य केले.यावेळी गट विकास अधिकारी संदीप नारखेडे,गट शिक्षणाधिकारी एन जे फाळके,नायब तहसीलदार घोटकर,तालुका संयोजक दिनेश राठोड,छत्रपती शिवाजी क्रिकेट अकॅडमीचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंके,विजय पळसकर,मो.हफिज,आशिष साळुंके यांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा मार्गदर्शक स्वप्नील साळुंके यांनी केले तर योगासन बाबत माहिती मानसी पांडे व ओम गायकवाड यांनी दिली.आभार प्रदर्शन तालुका क्रीडा अधीकारी लक्ष्मीशंकर यादव यांनी केले.