Headlines

गळफास घेवून महिलेची आत्महत्या, नांदुरा शहरातील शिक्षक कॉलनी मधील घटना

नांदुरा : ३९ वर्षीय मनोरुग्ण महीलेने घराच्या छताला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ८ जुलै रोजी दुपारी शहरातील शिक्षक कॉलनी या भागात घडली. वर्षा सखाराम अंभोरे असे मृतक महिलेचे नाव आहे. या बाबत शहरातील शिक्षक कॉलनी येथे राहणारे कोठारी महाविद्यालयाचे सेवा निवृत्त शिक्षक सखाराम अंभोरे यांनी नांदुरा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले की, सोमवारी ८ जुलै रोजी माझी मुलगी वर्षा वय ३९ ही सकाळी उठली आणि वरच्या मजल्यावर गेली. त्यानंतर मी खालच्या मजल्यावर दैनंदिन कामे करून स्वयंपाक करून घरातच आराम केला. दुपारी बाराच्या सुमारास मी वर्षा हीला उठवण्याचा खुप प्रयत्न केला मात्र ती उठली नाही. त्यानंतर मी दुपारी पावणे तीनच्या सुमारास डायल ११२ वर फोन केला तेव्हा पोलिस आले आणि त्यांनी खिडकीची काच फोडून पाहिले असता वर्षा हीने घराच्या छताला नायलॉन दोरीने बांधून गळफास घेतल्याचे दिसून आले. वर्षा ही गत १५ वर्षांपासून मनोरुग्णा सारखी वागत असल्याने तीच्यावर उपचार सुरू होते. अशा फीर्यादी वरुन नांदुरा पोलिसांनी कलम १९४ बी एन एस मर्ग दाखल केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *