Headlines

शेती हडपणाच्या प्रकरणातील अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी कुणाल सावळे यांचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

मलकापूर :- शेती हडपण्याच्या प्रकरणावरून मलकापूर येथील कुणाल सुधीरराव सावळे यांनी नांदूरा पोलीस स्टेशन येथे अजय प्रभाकर सावळे व संजय प्रभाकर सावळे यांच्याविरुध्द दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास हे तपास अधिकारी करीत आहेत. पोलिसांकडे प्रबळ साक्ष व कागदोपत्री सबळ पुरावे असतांना ठाणेदाराने खोटा गुन्हा दाखल केला, असा आरोपी आरोप करीतआहे. ही बाब ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’, असे ठरत आहे. असे असतांना आरोपी अजय सावळे व संजय सावळे हे तपास अधिकारी यांच्या तपासामध्ये अडथळा निर्माण करीत आहे. आरोपी हे ठाणेदार नांदूरा विलास पाटील यांच्या तक्रारी करीत आहेत. गुन्ह्यातील आरोपी ठाणेदारावर कारवाईची मागणी करुन अरेरावी करीत तपासात अडथळा निर्माण करीत आहेत. तसेच साक्ष पुरावे प्रभावीत करीत आहेत. त्यामुळे दोन्ही आरोपींची अटकपूर्व जामीन रद्द करण्यास पोलीस विभागातर्फे उच्च न्यायालयात दाद मागण्याची तसदी घेवून निष्पक्ष तपास करावा व फिर्यादीस न्याय मिळवून देण्याचे व गुन्ह्याचे खऱ्या अर्थाने सत्यापन करावे, अशी तक्रार १६ जुलै रोजी मलकापूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे कुणाल सावळे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *