Headlines

अवैध दारू विक्रेत्यावर नांदुरा पोलिसांची कारवाई, दुचाकीसह 21 हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदुरा:- अवैध देशी दारू विक्री करणाऱ्यावर नांदुरा पोलिसांनी ७ जुलैच्या रात्री ७.४५ वाजताच्या सुमारास कारवाई केली.दरम्यान त्याच्या कडून 21 हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि चांदुर बिस्वा येथील आठवडी बाजारात देशी दारुची अवैध विक्री सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ७ जुलैच्या रात्री ७.४५ वाजता उपरोक्त ठिकाणी धाड टाकली. त्यावेळी आरोपी विनोद अरुण वाघोदे (वय ३५ वर्षे) रा. मोमीनाबाद हा देशी दारुची अवैध विक्री करतांना रंगेहात मिळून आला. यावेळी त्यांच्या ताब्यातून हिरो होंडा स्प्लेंडर क्रमांक एमएच-२८-एम-५४५१ (किंमत २० हजार रुपये), देशी दारु संत्रा ९९९ कंपनीच्या १८० मीलीच्या सिलबंद शिश्या, एक वायरची थैली, असा एकुन २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी नांदुरा पोलिसांत उपरोक्त आरोपीविरुध्द महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार चौधरी हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *