Headlines

विदर्भ पटवारी संघाचे तहसील कार्यालया समोर एक दिवशीय धरणे आंदोलन

मलकापूर :- जिल्हा प्रशासनाने अवैध रेती उत्खनन व अवैध रेती साठा प्रकरणी महसूल, पोलीस व परिवहन या तिन्ही विभागातील अधिकारी व कर्मचारी पांची सामुहीक जबाबदारी असताना देखील केवळ आणि केवळ केवळ तलाठी मांनाच जबाबदार धरून त्यांच्या गैरसोईच्या ठिकाणी बदल्यांचा तसेच नियतकालिक बदल्यांसाठी पात्र तलाठी यांचे समुपदेशन न घेता अन्यायकारक व बेकायदेशीर बदल्यांचा प्रस्ताव मान्यतेसाठी मा. विभागीय आयुक्त, अमरावती यांना पाठविला आहे. तसेच बऱ्याच कालावधी पासून प्रलंबित मागण्याविषयी जिल्हा प्रशासनाच्या उदासीन धोरणा मुळे मुळे तलाठी व मंडळ अधिकारी संवर्गामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या आठमुठे धोरण विरोधात प्रस्तावित अन्यायकारक बदल्या रद्द करणे व इतर प्रलंबित मागण्यासंदर्भात विदर्भ पटवारी संघ नागपूर, जिल्हा बुलडाणा यांनी मा. विजेंद्रकुमार धोंडगे, जिल्हाध्यक्ष यांचे नेतृत्वात दि. 16.07.2024 रोजी जिल्हा प्रशासनाला आंदोलनाची नोटीस दिली आहे. प्रस्तावित अन्यायकारक बदल्या रद्द करणे, प्रशासकीय बदलीस पात्र तलाठी पांचे समुपदेशन घेऊन बदल्या करणे, विनंती व आपसी बदल्या करणे, जिल्हा स्तरावरील तलाठी आस्थापना रद्द करणे जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, नवीन लॅपटॉप व प्रिंटर विनाविलंब देण्यात देणे, प्रलंबित तलाठी कार्यालय भाडे, नायब तहसीलदार पदासाठी तलाठी / में अ.यांना खात्यांतर्गत विभागीय परीक्षा लागू करावी या शिवाय इतर प्रलंबित आर्थिक व सेवा विषयक मागण्या पूर्ण न झाल्याने आंदोलनाचा इशारा देण्यात आला या आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून तहसील कार्यालय मलकापूर समोर विदर्भ पटवारी व मंडळ अधिकारी संघ तालुका शाखा मलकापूर पांच्या वतीने एक दिवशी धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनास विविध पक्षाच्या आजी माजी पदाधिकारी यांनी भेट देऊन पाठींबा दर्शविला आहे. कोतवाल संघटना तालुका मलकापूर यांनी या आंदोलनास पाठींबा दर्शविला आहे. सदर सदर आंदोलनाच्या वेळी जिल्हा कोषाध्यक्ष संतोष राठोड, माजी जिल्हा सचिव माकोने साहेब, उपविभाग अध्यक्ष अनिरुद्ध वानखेडे, उपाध्यक्ष निता जायभाये, सचिव योगेश पाटील तालुका अध्यक्ष संतोष पारसकर उपाध्यक्ष धिरज जाधव सचिव कौशल HIC गहाजन याशिवाय व मंडळ अधिकारी के. जी. राजपूत, कोल्हे साहेब, झिने मॅडम, शशिकांत वानखेडे साहेब आजी माजी पदाधिकारी व मलकापूर तालुक्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी सभासद हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *