नांदुरा : भरधाव मिनी ट्रकचालकाने दुचाकीला धडक दिल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर पती जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील वडी फाट्यानजीक १४ जून रोजी सकाळी ११:४५ वाजेदरम्यान घडली. याबाबत जानकीराम तुकाराम निंबाळकर (५९), रा. नवी येरळी, ता. नांदुरा यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यामध्ये ते पत्नीसह दुचाकीने राष्ट्रीय महामार्गाने येत असताना वडी फाट्यानजीक मिनी ट्रक क्रमांक एमएच २७ एक्स ७८४० च्या चालकाने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्या धडकेत तक्रारकर्त्यांसह सोबत असलेल्या दुचाकीस्वार मनोरमा जानकीराम निंबाळकर (४८) यांचा जागीच मृत्यू झाला, तर तक्रारकर्ता जखमी झाल्याचे म्हटले. याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याने मिनी ट्रकचालकाविरुद्ध भादंविच्या कलम २७९, ३३७ ३०४ (अ) अन्वये तसेच सहकलम १३४ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हे दाखल केले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत मोरे करीत आहेत