मलकापूरः भरधाव चारचाकी वाहनाने पादचारी पोलीस पाटलाला उडवल्याची घटना आज दि.1 रोजी राष्ट्रीय महामार्ग ५३ वर हॉटेल यादगारनजीक सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात पोलीस पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.
( नामदेव तुकाराम कवळे ) वय 58 वर्ष रा.कुंड बु.असे अपघातात मृत्यू झालेल्या पोलीस पाटलांचे नाव असून ते येथील पोलीस पाटील आहेत. ते नेहमीप्रमाणे मलकापूरला येण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. त्यांनी कुंड.बु फाट्यावरून महामार्ग ओलांडला त्यानंतर हॉटेल यादगार नजीक वाहन पकडण्यासाठी ते चालत होते. दरम्यान मुंबई वरून नागपूरकडे जाणाऱ्या जिजे -15 बी एफ 25 64 या भरधाव चार चाकी वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. हे धडक एवढ्या जोरात होती की पोलीस पाटील हे काही अंतरावर हवेत उडाले त्यानंतर खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला. वाहन चालकाने वाहन न थांबवता पसार झाला. अपघाताचा व्हिडिओ महामार्ग व्यवस्थापनाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सदर वाहन हे गुजरात मधील असल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसून येत आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.