मलकापूर:- तालुक्यातील लोणवडी येथील बारा वर्षीय चिमुकल्याची अचानक तब्येत बिघडल्याने मृत्यू झाल्याची घटना दि.26 जून बुधवार रोजी दुपारी घडली. अथर्वचा मृत्यू झाला त्याचदिवशी वडिलांचा जन्मदिवस सुद्धा होता.
याबाबत सविस्तर वृत्त असे की ( अथर्व नितीन खर्चे वय १२ वर्ष )रा.लोणवडी असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. अथर्वचे वडील शेती करून आपला कुटुंबाचा उदारनिर्वाह चालवितात. अथर्वचे दोन दिवस अगोदर पोट दुखत होते.अचानक उलट्या झाल्या म्हणून अथर्वला दवाखान्यात दाखल केले. रक्त व लघवीची तपासणी केली मात्र त्यामध्ये सर्व रिपोर्ट निरंक आले. मात्र दुसऱ्या दिवशी त्याची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना परत दवाखान्यामध्ये हलविण्याचा निर्णय खर्चे कुटुंबीयांनी घेतला. मात्र त्याला काळ्यापाण्याची उलटी झाली त्यामुळे हादरलेल्या कुटुंबीयांनी पळापळ केली मात्र त्यांचे प्रयत्न अयशस्वी झाले आणि अथर्व याचा मृत्यू झाला. अथर्वच्या रक्ताच्या चाचण्या सर्व निरंक असताना मृत्यू कसा झाला हा प्रश्न अनुत्तरीत आहे. नितीन खर्चे यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. एकुलता एक मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.