मलकापूर :- डॉ.राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय मलकापूर हे राष्ट्रीय मानांकन (NAAC)प्राप्त महाविद्यालय आपल्या सामाजिक जबाबदारी अंतर्गत महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकामार्फत विविध समाजउपयोगी उपक्रम राबवत असते त्याचाच एक भाग म्हणून 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये *दिनांक 18 जून 2024 ते 22 जून 2024* या कालावधीत मलकापूर परिसरातील नागरिकांसाठी मोफत योग् शिबिराच्या आयोजन करण्यात आले होते. आर्ट ऑफ लिविंग मान्यताप्राप्त योग प्रशिक्षक महाविद्यालयाचे प्राध्यापक रितेश पोपट आणि प्राध्यापक मंगेश देवकर यांनी पाच दिवसीय योग् शिबिरामध्ये प्रशिक्षण दिले. यामध्ये विविध प्रकारची आसन प्राणायाम आणि ध्यान यांचा समावेश होता विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त व्यायाम म्हणजे अष्टांग सूर्यनमस्कार तसेच जेष्ठ नागरिक आणि सर्वांसाठीच उपयोगाचे पद्म साधना ज्यामध्ये 12 आसनांचा संच एकत्रित कसा करायचा याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आणि या धकाधकीच्या जीवनात तणाव मुक्त होण्यासाठी अतिशय उपयुक्त असे ध्यान या शिबिरामध्ये घेण्यात आले मलकापूर परिसरातील नागरिक आणि महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सदर शिबिरामध्ये सहभागी झाले. सदर शिबिर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकामार्फत घेण्यात आले. सदर शिबिर यशस्वी करण्याकरिता प्राध्यापक मुकेश बाभुळकर कार्यक्रम अधिकारी ,राष्ट्रीय सेवा योजना, सर्व स्वयंसेवक महाविद्यालयाचे प्राध्यापक वैभव अखंड, प्राध्यापक अनंता तीतरे यांनी कष्ट घेतले.