मलकापूर: शहराच्या इतिहासात प्रथमच मोठ्या पडद्यावरील दाखवल्या जाणाऱ्या मराठी चित्रपटाची निर्मिती गजराज फिल्म प्रोडक्शन च्या वतीने होणार आहे. येत्या ०३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता,क्रीडा संकुल येथे “बेक्कार” या मोठ्या स्तरावरील चित्रपटाचे चित्रीकरण शुभारंभ आयोजित केला असून परिसरातील लोकांसाठी आनंदाची बाब ठरणार आहे.
लाखोंची गुंतवणूक खर्च करून “गजराज फिल्म प्रोडक्शन” च्या वतीने “बेक्कार” या मराठी चित्रपटाची निर्मिती होऊन मोठ्या पडद्यावर दाखवले जाणार आहे. या चित्रपटाचे निर्माते वाजीद कादरी व रामा मेहसरे आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन सुधीर कुमार तायडे आणि रामा मेहसरे करीत आहे. “बेक्कार” या चित्रपटाचे कथालेखन सुधीर कुमार तायडे यांनी केले आहे. तसेच चित्रपटात सेलिब्रिटींना सुद्धा पहावयास मिळणार आहे. सेलिब्रेशन मध्ये सुरेश विश्वकर्मा (सैराट फेम), गजेंद्र जाधव (सिंघम रिटेर्न फ्रेम), रितू राजे (वराडे बाणा फेम) तसेच उत्कृष्ट गायक अजय गोगावले,श्रेया घोषाल आदी असणार आहेत.
सामाजिक स्तरावर असलेल्या बेरोजगारी या गंभीर प्रश्नावर आधारित चित्रपटाची मुख्य कथा आहे. या चित्रपटातील नायक व त्याचे सह नायक बेरोजगारीने पछाडलेले असल्याने राजकीय व प्रशासकीय व्यवस्थेतील भ्रष्टाचारा विरोधात बंड पुकारून जनसामान्यांना न्याय देण्यासाठी पेटून उठलेल्या भूमिकेत दिसणार आहेत.
लाखोंच्या गुंतवणूक खर्चातून उभारल्या जाणाऱ्या गजराज फिल्म प्रदर्शनच्या या बेक्कार मराठी चित्रपटाचे चित्रीकरण शुभारंभ मुहूर्त कार्यक्रम दिनांक 3 जुलै रोजी सकाळी 11 वाजता क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमासाठी बुलढाणा पोलीस अधीक्षक सुनील कडासने साहेब, उद्योगपती संतोष बोरगावकर साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी देवराम गवळी साहेब आदींची उपस्थिती राहणार आहे.