Headlines

वायफर दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या ट्रेलरला भरधाव ट्रकची धडक, एक गंभीर जखमी समृद्धी महामार्गावरील घटना

मलकापूर पांग्रा : वायफर दुरुस्तीसाठी समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रेलरवर भरधाव ट्रक आदळला यामध्ये तीनजण जखमी झाले असून त्यातील एकजण गंभीर जखमी झाला आहे ही घटना समृद्धी महामार्गावर चॅनल क्रमांक ३३५ ५ वर २ जुलै रोजी घडली.

ट्रेलर क्र. एमएच ४९ एटी ३१४८ चे वायफर बिघडल्याने समृद्धी महामार्गावर उभा होता यावेळी मागून येणाऱ्या भरधाव ट्रक क्रमांक सीजी ०४ एलएफ ५५०१ ने ट्रेलरला जबर धडक दिली यामध्ये समीर करकट्टा रा छत्तीसगड हा गंभीर जखमी झाला आहे तसेच सुकलाल करकट्टा, नवनाथ माळवे, पप्पू सोनी हे जखमी झाले जखमींना तातडीने सामान्य रुग्णालय जालना येथे रवाना करण्यात आले दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर क्रेन जेसीबीच्या साह्याने पीएसआय गजानन उज्जैनकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल मुकेश जाधव, विष्णू गोलांडे, एमएसएफच्या जवानांसह
क्यूआरव्हीचे जवान यांनी अपघातग्रस्त वाहनातील दोघांना बाहेर काढले समृद्धी महामार्गावरील अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!