मोताळा :- नळगंगा नदीपात्रात एका ५१ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. ही घटना 3 जुलै रोजी गावातीलच एका व्यक्तीला दिसून आल्याने उघडकीस आली आहे.बाळू शिवराम देवकर रा. बोराखेडी असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी राजू टोकरे यांच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राजू रमेश टोकरे यांनी बोराखेडी पोलीसात दिलेल्या फिर्यादीनुसार २ जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास गावातीलच बाळू शिवराम देवकर हा घरून गेला होता दरम्यान ३ जुलै रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास बोराखेडी शिवारातील शांताराम चहाकर यांच्या शेताजवळ नळगंगा नदीच्या पात्रात चंपीच्या डबक्यामधील पाण्यात बाळू देवकर यांचा मृतदेह आढळून आला आहे अशी बोराखेडी पोलीसात फिर्याद दिली आहे. घटनेची माहीती मिळताच पीएसआय विजयकुमार घुले, नापोका अमोल खराडे, पोकों प्रमोद साळोक यांनी घटनास्थळी धाव घेत नदीपात्रातील प्रेत ताब्यात घेत पंचनामा केला.