Headlines

खेळताना लोखंडी गेट अंगावर पडल्यामुळे दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

वृत्तसेवा

नागपूर : खेळताना लोखंडी गेट
अंगावर पडल्यामुळे दीड वर्षाच्या चिमुकलीचा अंत झाला. ही हृदयद्रावक घटना कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी २९ जूनला सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.अनन्या नीतेश गेडाम (दीड वर्ष) रा. कडू ले-आऊट, नारी असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. कपिलनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनन्या शनिवारी सकाळी ११ वाजता आपल्या घरासमोर खेळत होती. दरम्यान, राणी यादव यांच्या घराचे लोखंडी गेट तिच्या अंगावर पडल्यामुळे चिमुकलीच्या डोक्याला मार लागून ती गंभीर जखमी झाली. तिला नातेवाइकांनी उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेले असता दुपारी १२:३० वाजता उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी मिळालेल्या वैद्यकीय सूचनेवरून कपिलनगर ठाण्याचे हवालदार भीमराव सोनटक्के यांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!