शेगाव:- कटलरी सामान आणण्यासाठी गेलेली विवाहिता चार वर्षीय चिमुकलीसह बेपत्ता झाल्याची घटना दि.21जुलै रोजी तेली पुरा भागात घडली आहे, ( आरती प्रमोद माठे,वय 25 वर्ष )( दिशीका प्रमोद माठे,वय 4 वर्षे ) असे बेपत्ता झालेल्या आई मुलीचे नाव आहे. याबाबत प्रमोद विठ्ठल माठे यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की ते शीतला माता मंदिर तेलीपुरा भागात परिवारासह वास्तव्यास आहे. संत गजानन महाराज मंदिरात ते सेवाधारी म्हणून काम करतात. त्यांचे लग्न 2015 मध्ये आरतीसोबत झाले होते. त्यांना दोन वर्षाचा मुलगा आणि 4 वर्षाची मुलगी आहे. फिर्यादी हे नेहमीप्रमाणे संस्थांनमध्ये काम करून सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घरी आले, त्यावेळी त्यांची पत्नीने त्यांना कटलरी सामान आणण्यासाठी बाहेर जात असल्याचे सांगितले, पत्नी आणि मुलगी दोन्ही बाहेर सामान आणण्यासाठी गेल्या मात्र उशिरापर्यंत घरी न आल्याने त्यांचा नातेवाईकांकडे शोध घेतला असता मिळून आल्या नाही याबाबत प्रमोद माठे यांनी शेगाव पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार नोंदवली. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.